सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. रविकांत सुभाष खमितकर यांना “डिझाईन अँड परफॉर्मन्स इव्हॅल्यूएशन ऑफ मशीन लर्निंग बेस्ड अॅप्रोचेस फॉर हार्डवेअर ट्रोजन डिटेक्शन इन FPGA बेस्ड सिस्टम ऑन चिप (SoC)” या विषयावर केलेल्या संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांच्यासह समस्त विश्वस्तांनी आणि पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. आर. आर. दुबे, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. आर. गेंगजे, प्राचार्य डॉ. व्ही. ए. आठवले, तसेच हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



















