सोलापूर : सोलापूरमधील नियोजन भवन येथे डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिभाषा धोरण निश्चिती समितीच्या जनसंवाद कार्यक्रमात या धोरणाविषयी मुद्देसूद विश्लेषण मांडताना जनार्दन वाघमारे यांनी मराठी भाषा ही आपली संस्कृती टिकवून ठेवणारी भाषा असून त्याची अभिजात दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ती सक्तीची असावी असे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेचा विचार करून इतर भाषा वृद्धिंगत करावे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार निश्चित केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यात त्रिभाषेचा समन्वय साधता आले पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मार्ग सुखकर होईल.
यावेळी डॉ,नरेंद्र जाधव, सदानंद मोरे , वामन केंद्रे,मधुश्री सावजी,भूषण शुक्ल,संजय यादव गणपती मोरे,सुलभा वठारे, कादर शेख, सचिन जगताप आदी उपस्थित होते.



















