सोयगाव – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप कुमार स्वामी यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर यांच्या प्रेरणेने सोयगाव गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे व केंद्रप्रमुख सोयगाव फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे दक्षसूत्री कार्यक्रमा अतर्गत पालकसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालक सभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रवींद्र काळे,उपाध्यक्ष मंगेश सोहनी,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य हर्षल काळे,राजेंद्र दुतोडे,रवींद्र साखळे,अण्णा वाघ यांची उपस्थिती होती.यावेळी वर्ग एक ते सातच्या विद्यार्थ्यांचे जवळपास ३०० पालकांची उपस्थिती होती.
पालकसभेस शाळेतील मुख्याध्यापक किरणकुमार पाटील व सहशिक्षिका प्रतिभा कोळी यानी पालकांना दक्षसूत्री उपक्रमतर्गत उपक्रमांची यात गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रधान करणे,स्पर्धाक्षम व कौशल्य धार विद्यार्थी घडविणे आनंददायी व नाविन्यपूर्ण रचनात्मक शिक्षण घेणे आरोग्यवर्धक व संस्कारक्षम विद्यार्थी तयार करणे तंत्रस्नेह आयटी सक्षम विद्यार्थी तयार करणे सुप्त गुण शोधून त्याला प्रोत्साहन देणे स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन लेखक कवी निर्मिती ज्ञानातील आधुनिकता ग्रहणासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे स्वावलंबन प्रवृत्तीला चालना देणे देशभक्ती व मातृ-पितृ भक्ती वाढविणे गुरुकुल पद्धतीला उजाळा देत १००% शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती वाढवणे याविषयी माहिती समजून सांगितली तसेच शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे माहिती पालकांना समजावून दिली यात वर्ग पाचवा आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा पूर्वतयारी सुरू असल्याचे नियोजन सांगण्यात आले तसेच शाळेतील परसबाग निर्मिती व सद्यस्थितीवर परस बागेचे महत्त्व सांगण्यात आले.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणोत्तर वाढी संदर्भात उपक्रमांची माहिती देण्यात आली.
इको क्लब एक पेड मा के नाम उपक्रम शाळेत सुरू असल्याची माहिती देण्यात आली.शाळेत विद्यार्थी सुरक्षा विषयक कारवाई सुरू असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संदर्भात शाळेत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पालकांमधून शाळेतील विद्यार्थी शाळा व शिक्षक यांच्या विषयी पालक विष्णू मापारी यांनी आपल्या भाषणातून समाधान व्यक्त केले.तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पालक उपस्थित होत्या. यावेळी महिला पालक व पुरुष पालक यांनी शाळेसंदर्भात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शाळेविषयी काही सूचना केल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, पदवीधर शिक्षिका सुरेखा चौधरी,पंकज रगडे,रामचंद्र महाकाळ,मंगला बोरसे,सविता पाटील,प्रतिभा कोळी,गणेश बावस्कर,पांडुरंग बारगजे,अंकुश काळे,मंदा मस्के यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक पंकज रगडे यांनी केले तर आभार मंगला बोरसे यांनी मानले.यावेळी शाळेतील शिक्षक व पालक यांनी शाळेच्या सुशोभीकरणासाठी जवळपास ३० फुल झाडांची रोपे शाळेला भेट दिली.
सोबत फोटो –



















