जिंतूर / परभणी – जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदान जनजागृती अभियान अंतर्गत मतदारांना जागृत करण्यासाठी मतदार जनजागृती प्रतिज्ञाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न स्वीप पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिंतूर नगरपरिषदेच्या विविध ठिकाणी मतदार जनजागृती प्रतिज्ञा घेण्यात येत आहे. मतदान जनजागृती बॅनर व भोंगा असलेल्या वाहनाच्या माध्यमातून सुद्धा मतदारांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात येत आहे.
या मतदान जनजागृती विशेष कार्याचे उपविभागीय अधिकारी सेलू तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद शैलेश लाहोटी, तहसीलदार जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, उपमुख्याधिकारी अनिल समिंद्रे, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंढे, मिडिया पथक प्रमुख नायब तहसीलदार प्रशांत राखे, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती पथक प्रमुख त्र्यंबक पोले यांनी कौतुक केले. व सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन केले.
मतदान जनजागृती कार्यासाठी पथक प्रमुख गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, साहित्यिक मयूर जोशी, राजेंद्र ढाकणे, प्रवीण घुले, दिनकर घुगे, मारोती घुगे विशेष मेहनत घेत आहेत.



















