अंबड / जालना – अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगर व युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडील कामगारांना राज्य शासनाने राज्यातील साखर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात स्थापन केलेल्या त्रिपक्षीय समितीचे निर्णयानुसार कारखान्याचे मार्गदर्शक माजी आरोग्य मंत्री तथा त्रिपक्षीय समितीचे सदस्य मा.श्री.राजेश टोपे साहेब यांच्या संकल्पनेतून मा.संचालक मंडळाने १०% वेतनवाढ माहे ऑक्टोबर २०२५ पासून लागू केली आहे.
कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णयामुळे कारखान्याचे कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल सर्व कामगार व समर्थ सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेने कारखान्याचे मार्गदर्शक माजी आरोग्य मंत्री तथा त्रिपक्षीय समितीचे सदस्य मा.श्री.राजेश टोपे साहेब, कारखान्याच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष व मा.संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने नेहमीच कामगारांचे हित जोपासले आहे. कारखान्याचे व्यवस्थापनाकडून कामगारांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. व्यवस्थापन व कामगारांचे संबंध नेहमीच खेळी मेळीचे राहीले आहेत अशा भावना अनेक कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.



















