जाफ्राबाद / जालना – दिवसेंदिवस जमिनीतील पाणी पातळी कमी होत असून अनेक वेळां पर्जन्यमान कमी झाल्याने नेहमी आपल्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो त्यासाठी सर्वांनी एकमेकांची जिरविण्यापेक्षा जमिनीत पाणी जिरविण्यासाठी काम केले पाहिजे असे मिश्किल वक्तव्य आमदार संतोष पाटील दानवे यांनी आरदखेडा येथे प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत मंजुर केलेल्या 17 लक्ष रुपयांच्या गाव तलावाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत असताना केले.
पुढे बोलताना आमदार दानवे म्हणाले की,देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या केंद्र सरकारने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या राज्य सरकारने सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठी अनेक निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.
मुख्य म्हणजे शेतकऱ्याच्या हितासाठी अविरतपणे काम करणारे नेतृत्व असल्याचेही ते म्हणाले.
त्यामुळे आपण कायमस्वरूपी या नेतृत्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे हात आणखी ही बळकट करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विजय नाना परिहार, तहसीलदार डॉ.सारिका भगत, संतोष पाटील लोखंडे, नाना पाटील भागिले, दीपक पाटील वाकडे, भाऊसाहेब पाटील जाधव,गोविंदराव पाटील पंडित, राजेश पाटील चव्हाण, सुधीर पाटील, दगडुबा गोरे,साहेबराव कानडजे,उपअभियंता एस.एस वाघमारे, गजानन लहाने,मंगेश लहाने,दासु पाटील उबाळे,विजय बोराडे,ज्ञानेश्वर पवार,यमाजी पवार, गजबसिंग घुसिंगे, गणेश फुकट, रामेश्वर पवार,दिपक डोळे,भीमराव दांडगे, शिवाजी भिसे,अमोल उगले, रमेश साबळे, बाबुराव शिंदे,शरद पवार आदींसह स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



















