सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळात 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने व मुख्य लिपिक माहेजबीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. अमोल गायकवाड यांनी भारताचे संविधान मधील प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारताचे थोर सुपुत्र व सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त अशोक कामटे, मुंबईचे एसटी पथकाचे प्रमुख पोलीस अधिकारी हेमंत करकरे, चकमक फेम गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक विजय साळसकर, सोलापुरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 10 चे जवान राहुल शिंदे, एन. एस. जी. मधील मेजर संदीप उन्नीकुष्णन शहीद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार आपण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे लेखापाल मल्लिकार्जुन हिरेमठ, महेश वालावलकर, सारंग अंजीखाने, अमोल गायकवाड, अविनाश शिंदे, रियाज अत्तार, तरंगिणी कोंडा, अबरार डोंगरी, तुकाराम भोसले, जाकीर सय्यद, ताहीर बिराजदार, संभाजी घुले, श्रावण भंडारे, वैभव साखरे, भालचंद्र साखरे, सायली ढोले, नाशिर खान, सचिन साखरे आदी उपस्थित होते.



















