सोलापूर – मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ आणि संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. “यंदाच्या शिबिरात 310 रक्तपिशव्यांचे संकलन करून आम्ही नवा उच्चांक गाठला आहे. समाजाच्या या अद्वितीय प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अमित मंचले यांनी दिली.
दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी, मसिहा चौक, मोदी, सोलापूर येथे सकाळी 8.00 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत हे शिबिर पार पडले. सोलापूर ब्लड बँक व मेडीकेअर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचा शुभारंभ नरसय्या आडम व माजी नगरसेविका कामिनी आडम यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीदेवी फुलारे, वैष्णवी अंबादास करगुळे, श्रीकांत डांगे, अॅड. अनिल वासम, मारेप्पा कंपली यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सोलापूर ब्लड बँक, मसिहा तरुण मंडळ, सहकारी मित्रवर्ग आणि सर्व रक्तदाते यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्था हे रक्तदान शिबिर केवळ सेवा नाही तर शहीदांविषयी कृतज्ञतेची भावपूर्ण सलामी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



















