सोलापूर: अक्कलकोट रोडवरील मार्कंडेय जलतरण तलाव ते उद्यान या रस्त्यावरील अतिक्रमण सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून हटविण्यात आले. या कारवाईत चार खोके निष्काशीत करण्यात आली तर चार चाकी चार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमण विरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी अक्कलकोट रोडवरील मार्कंडेय जलतरण तलाव ते उद्यान या रस्त्यावरील अतिक्रमण सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभाग पथकाकडून हटविण्यात आले. यावेळी फुटपाथवरील खोके, पत्राशेड, पान टपरी, हातगाडी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण काढण्यात आले. प्रतिबंधक विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ही पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने ही कार्यवाही केली. या मोहिमेत
चार खोके निष्काशीत करण्यात आली तर चार चाकी चार गाड्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यावेळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागप्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता सूफियान पठाण यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.



















