कोंडी — महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे सोलापूर संचलित जिजामाता प्राथमिक शाळा , जिजामाता बालक मंदिर कोंडी येथे आज संविधान दिन व शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कुंटेलूसर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पांडुरंग कुंटेलूसर यांनी भूषविले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की,
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला हक्क दिले आहेत, परंतु हक्कांसोबत कर्तव्येही तितकीच महत्त्वाची आहेत. संविधानाचे ज्ञान प्रत्येक भारतीयाने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांनी भाषणे, चारोळ्या, आणि माहिती पर मनोगत व्यक्त केले.
यानंतर संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची गावातून भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान संविधानाचा सन्मान – देशाचा अभिमान!, हक्क जाणूया – कर्तव्य पार पाडूया! अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जागृती निर्माण केली.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन भैय्या ठोकळ ,सचिवा सौ शिल्पाताई ठोकळ यांनी शुभेच्छा संदेश पाठविले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















