सोलापूर : २६/११ शहीद दिनानिमित्त शहीद वीरांप्रती शिवसेनेचे युवानेते श्रीनिवास संगा यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. संविधान दिनाच्या निमित्ताने तरुणांनी लोकशाही मूल्यांचे जतन करावे असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त ‘श्री’ प्रतिष्ठान तर्फे विविध उपक्रम राबवून लोकशाही, स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता या संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती करण्यात आली. राष्ट्रनिर्मितीतील संविधानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानकडून करण्यात आला. याचबरोबर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि निरपराध नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित शहीद दिन कार्यक्रमात ‘श्री’ प्रतिष्ठानने शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
देशासाठी प्राण अर्पण केलेल्या वीरांच्या त्यागाचे स्मरण करून उपस्थितीने क्षणभर स्तब्धता पाळली. कार्यक्रमाचे प्रमुख ‘श्री’ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, अखिल भारत पद्मशाली युवक संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अतिश म्हेत्रे, हिरालाल चन्नापट्टन, संतोष संगा, बालाजी श्रीचिप्पा, किसन पासकंटी, गोवर्धन पासकंटी, एडवोकेट संदीप संगा, सचिन जवळकर, अजय आडम, महेश कल्याणम, पवन येलदंडी, यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.



















