भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा आहे, ती म्हणजे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये होणारी पडझड होय. २५ जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी टॉप २० मधून बाहेर झाले. समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
अदानी प्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवण्यास सुरूवात केली आहे. या सर्व गोंधळावर स्वत: अदानी आणि अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या LICने स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय शेअर बाजारात अदानी ग्रुपबद्दल सुरू असलेल्या या चर्चेवर आता माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नाव न घेता भारताच्या माजी स्फोटक सलामीवीराने हिंडेनबर्गवर हल्ला चढवला आहे. गोऱ्या लोकांना भारताची प्रगती सहन होत नाही. इतक नाही तर हे संपूर्ण प्रकरण म्हणजे नियोजित गट आहे, असे सेहवाग म्हणाला. सेहवागने केलेल्या ट्वीटमध्ये भारतीय बाजाराला अशा पद्धतीने पाडण्याचा हा कट अतिशय चतुराईने आणि नियोजित पद्धतीने केला आहे.
सेहवाग पुढे म्हणतो की, “किती ही प्रयत्न करा, पण भारत नेहमी प्रमाणे अजून मजबूतीने उभा राहिल”. सेहवागचे हे ट्वीट काही मिनिटातच जोरदार व्हायरल झाले. चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी त्याच्या या मतावर सहमती दर्शवली आहे.