सोलापूर : संविधान दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव माजी जी. ओ. सी. आणि जेष्ठ सल्लागार अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या माजी जि.ओ. सी. सुनीता अरुण गायकवाड तसेच सुचित्रा थोरे, मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, ज्येष्ठ सैनिक विठ्ठल थोरे, अंगद जेटीथोर,प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड,रत्नदीप कांबळे, यशवंत फडतरे, बाबासाहेब सातपुते प्रा. युवराज भोसले इत्यादी पुरुष आणि महिला सैनिक उपस्थित होते.



















