श्रीपूर – भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची लिहिलेली राज्य घटना ही सर्व जगात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी केले .
२६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून कारखाना कार्य स्थळावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
प्रथम डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ . कुलकर्णी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधान निर्माण करताना डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल अभ्यास करून भारताची राज्य घटना लिहीली या मध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्व नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करताना समानता , स्वातंत्र्य , शोषणा विरुद्ध , धार्मिक स्वातंत्र्य , सांस्कृतिक व शैक्षणीक तसेच संवैधानिक उपचारांचा अधिकार यावर भर दिला . त्यामुळे विविधतेत एकता निर्माण करणारी , राष्ट्रीयता जपणारी आपली राज्य घटना म्हणूनच श्रेष्ठ ठरते .
या वेळी पत्रकार दत्तात्रय नाईकनवरे , माजी जि . प . सदस्य सुहास गाडे , यांनीही आपल्या मनोगता मध्ये घटनेने जसे मुलभूत अधिकार आपणांस दिले तसेच काही कर्तव्यही सांगितली आहेत याचे आपण पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले .
याप्रसंगी प्रोडक्शन मॅनेंजर एम . आर . कुलकर्णी , मुख्य लेखापाल रविंद्र काकडे , ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर , डिस्टरली मॅनेंजर एस . आर . पाटील , परचेस ऑफीसर महेश देशपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ . सुधीर पोफळे,सेक्रेटरी भिमराव बाबर , कम्प्यूटर इंचार्ज तानाजी भोसले , मुख्य अभियंते सचिन विभूते , सिव्हील इंजिनिअर हणमंत नागणे , इंन्ट्रमेन्ट मॅनेंजर समिर सय्यद टाईम किपर सोपन कदम , रसायन तज्ञ मारती उपासे , सुरक्षा अधिकारी सदगर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ . सुधीर पोफळे यांनी तर आभार सोमनाथ भालेकर यांनी मानले .



















