- जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदलीनंतर गावकरी आक्रमक.
- परभणी जिल्ह्यातील इरळद गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेतील शिक्षकांच्य बदल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.
- जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या झालेल्या बदल्या तात्काळ रद्द करण्याच्या मागण्यासाठी गावकऱ्यांकडून आंदोलन
-
गावातील दुधना नदी पात्रात उतरून पालक आणि गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे.
- आंदोलनात शाळेतील विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत.
-
इरळद गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहा शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- शिक्षकांच्या बदल्या गावकऱ्यांना अमान्य आहे.
- बदली करण्यात आलेल्या शिक्षकांनी गावातील शाळा आदर्श केली असून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारल्याचा गावकऱ्यांनी दावा केला आहे.
- त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
- त्यामुळे गावकरी नदीत उतरून जलसमाधी आंदोलन करत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...