सोलापूर :- विकास नगर येथील महावीर हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे अंतरंग आणि बहीरंग पालटले. प्रत्येक माणसांवर मातृ – पितृ ऋण, समाज ऋण, गुरु ऋण व इतर ऋण असतात. माणसाने या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो परंतु तो मुक्त होऊ शकत नाही.
अशाच प्रकारे महावीर हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी विचार केला की प्रशालेतील शिक्षकांनी आम्हाला शिक्षणाबरोबर संस्कार, ज्ञान आणि एक उत्तम नागरिक बनविल्या मुळे आणि ज्या शाळेतील वर्गात व परिसरात आपण शिक्षण घेतलं खेळलो त्यामुळे आज आपण एक उत्तम नागरिक बनलेला आहे या साठी गुरुदक्षिणा किंवा शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा आपण या शाळेसाठी काहीतरी करू शकतो या उद्देशाने सन 2001 – 2002 चे माजी विद्यार्थिनी डॉ. अचला अरुण कांबळे हिने आई स्वर्गीय सौ. सुनीता अरुण कांबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेच्या संपूर्ण बाह्य भागाचे रंग रंगोटीचे काम करून दिले. यासाठीच्या संपूर्ण खर्चाचा भाग डॉ. अर्चना हिने एकटीच उचलली.
डॉ. अचला कांबळे हिचे वरील उत्कृष्ट कार्य पाहून 2003 – 2004 चे माजी विद्यार्थ्यांनी मिळून एकूण 20 वर्ग खोल्यांचे आतील भागाचे रंगरंगोटी करून दिलेले आहेत. या या रंग रंगोटी कामासाठी प्रशालेचे मुख्याध्यापिका उज्वला पाटील सहशिक्षक विजय पाटील, राजेंद्र खोत, संजय बिडवाई, बसवराज बिराजदार, मनीषा निनगुरकर, शिक्षकेतर कर्मचारी दीपक चौधरी, आनंद कोटे, महेश म्हंता, मोहन साळुंखे यांनी परिश्रम घेतले.



















