भोकरदन / जालना – अवैध गर्भपातासारख्या गंभीर आणि मानवताविरोधी कृत्यांनी भोकरदन तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. मागील काही माहिन्या पूर्वी भोकरदन शहरात अवैध सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांवर कारवाई झाली असताना आता पुन्हा बुधवारी दि २६ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नांजा वाडी येथे एका धक्कादायक घटनेत अवैध गर्भपात सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाले आहे.
या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या दोन आरोपींना व गर्भपात करण्यासाठी आलेल्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने ताब्यात घेतले असून, यामुळे आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नांजा वाडी परिसरात एका शेळीच्या गोठ्यात अवैध गर्भपात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि नियोजनबद्धरीत्या सदर ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात, कायदेशीर परवानगी नसताना आणि कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसताना महिलांचे गर्भपात केले जात असल्याचे हातावर सिद्ध झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गर्भपातासाठी वापरले जाणारे आक्षेपार्ह साहित्य, औषधी गोळ्या सोनोग्राफी मोबाईल आणि इतर महत्त्वपूर्ण वस्तू जप्त केल्या आहेत. तर यातील मुख्य आरोपी सतीश बाळू सोनवणे, वय-32 वर्ष, शिक्षण 12 वी रा.जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर दुसरा आरोपी केशव हरिभाऊ गावंडे, वय-49 वर्ष, व्यवसाय- पॅथॉलॉजिस्ट, रा.सराफा गल्ली, भोकरदन, जि.जालना यातील मुख्य आरोपी सतिश बाळू सोनवणे याच्यावर मागील काळात एका खाजगी डॉक्टरांच्या हाताखाली कंपाउंडर म्हणून कार्यरत होता तिथूनच सदरील अनुभवावर तो गर्भपात करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तर या आरोपी वर माघील काळात गर्भपात प्रकरणी बीड,छत्रपती संभाजी नगर, जालना, जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे तर भोकरदन मधील आरोपी पॅथॉलॉजी चालक केशव गावंडे या आरोपी वर मागील तीन महिन्यांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पाळतवर होती मागील काळात लोकेशन मिळाले असता तेथून संबंधित आरोपी असल्याचे सांगितले जाते,
‘गर्भलिंग निदान’ चा संशय
सध्याच्या काळात ‘गर्भलिंग निदान’ करून अवैध गर्भपात करण्याचा गोरखधंदा अनेक ठिकाणी सुरू आहे. नांजा वाडी येथे झालेल्या या कारवाईमध्ये देखील गर्भलिंग निदानानंतरच गर्भपाताचा प्रयत्न झाला असावा, अशी प्रबळ शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या रॅकेटचे जाळे किती दूरवर पसरले आहे आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस करत आहेत.
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
एकापाठोपाठ एक अवैध गर्भपात केंद्रांवर कारवाई होत असल्याने, भोकरदन तालुक्याची आरोग्य व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा गंभीरपणे अडचणीत आली आहे. शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या मोहिमा सुरू केल्या असताना, अशा घटना वारंवार घडणे हे दुर्दैवी आहे. स्थानिक आरोग्य विभागाने या प्रकारांकडे दुर्लक्ष केले आहे का? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध ‘पीसीपीएनडीटी ॲक्ट’ आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोकरदन पोलीस ठाण्यात सुरू होती. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सदरील कार्यवाही मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पदाधिकारी ए.पी.आय. पंकज जाधव योगेश उबाळे योगेश उबाळे ए. एस.आय.राजेंद्र वाघ एपी.आय. सचिन कामगार पोलीस कॉन्स्टेबल विजय डुक्कर,दीपक घुगे, प्रशांत लोखंडे,ईशान पटेल,रमेश राठोड,रमेश काळे,सतीश श्रीनिवास, सोपान क्षीरसागर, महिला पोलीस गोदावरी सरोदे सत्यभामा उबाळे यांच्यासह आरोग्य पथकात डॉ. विजय वाकोडे, डॉ.वायाळ डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. मनोज जाधव डॉ. मयूर गिराम , लोखंडे, चेपटे, यांच्यासह रुग्णवाहिका चालक समाधान जाधव बालाजी बरडे उपस्थित होते.



















