पारध / जालना : मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act, 1985) पारध पोलिसांनी मोठी कारवाई करत कल्याणी येथील एका इसमास ₹2,34,600/- किमतीच्या गांजाच्या झाडांसह रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 25/11/2025 रोजी सकाळी 10:20 वाजेच्या सुमारास कल्याणी शिवारातील गट क्र. 347 मधील एका राहत्या घराजवळ ही कारवाई करण्यात आली.
गुन्ह्याचा तपशील:
आरोपीत (पकडलेला इसम): नंदुसिंग जादुसिंग चांदा (वय 37, रा. कल्याणी, ता. भोकरदन, जि. जालना).
कलम : गुरनं 285/2025, कलम 20 (ब) ii (b) एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985.
जप्त केलेला माल:
₹2,34,600/- किमतीची, हिरव्या रंगाची, आंबट व उग्र वास असलेली, मुळासह माती लागलेली गांजाची झाडे, गांजाच्या मुळासहित असलेली काळसर रंगाची माती. एकूण अंदाजित किंमत: ₹2,34,600/-.
पोलिसांचे स्पष्टीकरण:
पोलिसांनी दिलेल्या ‘खुलासा’नुसार, पकडलेला आरोपीत हा आपल्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मादक पदार्थ गांजाची लागवड आणि संगोपन करत असताना मिळून आला.
फिर्यादी (Complainant) म्हणून पोउपनि वाल्मीक सुर्यभान नेमाणे (पोस्टे पारध) यांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सहायय्क पोलीस निरीक्षक एस. डी. माने (मो.क्रं. 7020920324) हे करत आहेत.
पोलीस अलर्ट! – या कारवाईमुळे अवैध मादक पदार्थांचे उत्पादन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक एस. डी. माने यांच्या नेतृत्वाखालील पथक या लागवडीच्या ‘मास्टरमाईंड’चा शोध घेत आहे.



















