नांदेड – आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या २३१ वी सार्वजनिक जयंती सोहळ्याचे दोन दिवसीय आयोजन लहुजी साळवे सांस्कृतिक सभागृह हडको येथे दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्याचे आयोजिले आहे तेव्हा जयंती सोहळ्यानिमित्त शाहिरी जलसा व प्रबोधन सभेचे ही आयोजन करण्यात आले आहे.
आद्य क्रांतिगुरू लहजी साळवे हे भारतीय क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात त्यांना काही वेळा लहुजी वस्ताद असेही म्हणून ओळखले जायचे लहुजींना युद्ध करण्याची प्रशिक्षण घरातूनच मिळाले होते या महान योद्धाची हडको येथील लहुजी साळवे सभागृहात दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय कार्यक्रम सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने आयोजिले आहे.
दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ध्वजारोहण गंगाधर वाघमारे यांच्या हस्ते होईल. तर सायंकाळी ४ वाजता शाहिरी जलसा शाहीर गौतम पवार भुकमारीकर आणि त्यांचा संच हे सादर करतील त्यानंतर ५ वाजता प्रबोधन सभेला सुरुवात होईल. याचवेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते होईल. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माधव डोम्पले तर यावेळी प्रवक्ते म्हणून डॉ .भगवानराव वाघमारे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
यावेळी या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती प्रकाश कांबळे हे असतील. तर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी या सभेचे उद्घाटन दक्षिणचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते होईल. या सभेचे अध्यक्ष आनंदा गुंडले हे असतील तर प्रमुख वक्ते म्हणून
ॲड.वैशालीताई डोळस हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील तर या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती प्राध्यापक विनोद काळे हे असतील. यावेळी विशेष उपस्थिती व प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती असेल तेव्हा ४
वाजता शाहिरी जलसा उद्याचा सूर्य या विषयावर कार्यक्रम होईल. तर सायंकाळी ५ वाजता प्रबोधन पर मार्गदर्शन होईल.तरी परिसरातील समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आव्हान जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मेकाले, उपाध्यक्ष उत्तमराव घोडसकर, कार्याध्यक्ष आनंदराव गायकवाड, सचिव पप्पू गायकवाड, स्वागत अध्यक्ष श्रीरंग खांजोडे, कोषाध्यक्ष मरीबा बसवंते, सहकोषाध्यक्ष नितीन वाघमारे, सहकार्याध्यक्ष ज्ञानेश्वर ढाकणीकर, संघटक संघपाल कांबळे, सहसचिव विठ्ठल घाटे, प्रसिद्धीप्रमुख संजय कुमार गायकवाड, संघटक पीएम सूर्यवंशी, संघटक ज्ञानोबा सूर्यवंशी, यांनी आव्हान केले आहे तर या कार्यक्रमाचे निवेदक बालाजी गवाले व निवेदिका वर्षा खानजोडे हे करतील. तेव्हा परिसरातील सर्व समाज बांधव व नागरिकांनी या जयंती सोहळ्यास उपस्थित राहून जयंती सोहळ्याची शोभा वाढवावी असे आव्हान लहुजी साळवे सार्वजनिक जयंती मंडळ हडको यांनी केले आहे.



















