पारध / जालना – भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोमांसची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून गुरूवार दि.२७ रोजी रेणुकाई पिंपळगाव ते आन्वा वाकडी रस्त्यावर पंधरा किलो गोमांस जप्त करण्याच्या कारवाई पाठोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.२८ रोजी रेणुकाई पिंपळगाव गावाजवळ बनेखां अहेमदखां पठाण यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर चोरून विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले अकरा किलो गोमांस तसेच ते ज्या मोटारसायकलद्वारे विक्रीस नेणार होते,ती मोटारसायकलही पारध पोलिसांनी जप्त केली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाणे, जमादार प्रकाश सिनकर, पोलिस शिपाई संतोष जाधव आदींनी ही कारवाई केली. अन्य एक आरोपी अस्लम रशीद कुरैशी,रा. शिवना,ता. सिल्लोड यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी एकूण साडेपाच हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.



















