सुस्ते – कलेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून महाराष्ट्राची कला, सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या, व्यक्ती संस्था आणि कलाकारांना दिला जाणारा युवा कीर्तन आणि समाज प्रबोधन सन 2024-25 हा सर्वोच्च मनाचा पुरस्कार बार्शी तालुक्यातील धामणगावचे भूमिपुत्र गुरुवर्य हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण मुंबईमध्ये मोठया थाटात वितरण होणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.यावेळी या विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी आणि बार्शीतील उद्योजक महेशशेठ यादव,अमृत राऊत,चिंतामणी आण्णा, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार हे राज्य शासनाकडून कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात. या पुरस्कारांमध्ये रोख रक्कम, मानचिन्ह आणि सन्मानपत्र यांचा समावेश आहे. पुरस्कारांच्या श्रेणींमध्ये ज्येष्ठ आणि युवा पुरस्कारांचा समावेश आहे. ज्यांची रक्कम आणि स्वरूप भिन्न आहे. हभप बोधले महाराज म्हणजे सातशे वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या संत माणकोजी बोधले महाराज यांचे रक्ताचे, विचाराचे कृतिशील वारसदार असून त्यांनी संत माणकोजी बोधले महाराज यांचे अभंग रचना असलेल्या बोधलीला ग्रंथाची अतिशय सरळ, सोप्या भाषेत उकल करून संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, इत्यादी राज्यात तसेच श्रीलंका सारख्या देशात सुद्धा असंख्य पारायणे करून समाज प्रबोधनाचे खूप मोठे कार्य हाती घेतलेले आहे.
वडील गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले महाराज यांचे कडून गुरु दिक्षा आणि संस्कार, घेऊन मागील पंचेवीस वर्षांपासून कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा बाबतीत कडाडून टीका करत संत साहित्यातून सात्विक भक्ती, विज्ञाननिष्ठ विचार पेरण्याचे अनुलाग्र कार्य अविरत पणे सुरु आहे विधी, तत्वज्ञान, संगीत अशा विविध विषयात पदवी आणि पदवीत्तर शिक्षण घेतलेले बोधले महाराज म्हणजे जुन्या आणि नव्या पिढीतील महत्वाचा दुवा म्हणून कार्य करतात संत साहित्याचा गाढा अभ्यास, व्यासंग असलेले जयवंत महाराज यांना अगदी अलीकडच्या सोशल मीडिया आणि एआय टेक्नॉलॉजी पर्यंतचे परिपूर्ण ज्ञान फक्त अवगत नाही तर परिपूर्ण आहे.

























