सुस्ते – पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील श्री खंडेरायाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.श्री खंडेरायाची घटस्थापना 16 नोव्हेंबर रोजी करण्यात झाली. परंपरेप्रमाणे देवाचे नऊ दिवस नऊ माळा घालून आरती व पूजा उत्साहात करण्यात आली.
यात्रेमुळे विद्युत रोषणाईने खंडोबाचे मंदिर सजवले होते. मंगळवार दि.25 रोजी देवाच्या घोड्याची गावातून पारंपारिक वाद्य हलगी व फाटक्याची आतिषशबाजी करतीत छबिना काढण्यात आला. यावेळी “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या जयघोषात संपुर्ण गाव दणाणून गेले होते.रात्री वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे तीन वाजता लगंर तोडून कार्यक्रमाचे सांगता झाली.26 रोजी मंदिरात दिवसभर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यात्रेचे औचित्य साधून येथील राजन किड्स स्कूल,चोरमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती आणि अंगणवाडीतील मुलांना यात्रा कमिटीच्यावतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.


























