सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक २ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवित विरोधी गटाच्या सर्व उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झाले आहे.
सर्वसाधारण मतदारसंघ गिरीश जाधव, सुधाकर माने देशमुख, श्रीकांत धोत्रे, श्रीकृष्ण घंटे, शशिकांत साळुंखे, यादव मोहन, अंकुश कोळेकर, दिनेश बनसोडे, समीर शेख, भीमाशंकर वाले, भटक्या विमुक्त मतदार संघातून रणजीत घोडके, ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे, महिला मतदारसंघातून राणी सुतार, संगीता हंडे बिनविरोध प्रदीप सकट असे एकूण १५ उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला.
पॅनलचे महेश जाधव, राजेंद्र माशाळ, रामस्वामी मनलोर, सिद्धाराम बोरुटी, अविनाश गोडसे, रवी कोरे , रणजीत घोडके, गिरीश जाधव, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.


























