सोलापूर – नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूरच्या अश्वमेध संघाने अत्यंत प्रतिष्ठित अंतरराष्ट्रीय फॉर्मुला इम्पीरियल २०२५ या स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ही फॉर्मुला इम्पीरियल स्पर्धा ही कोईमतूर येथील कोस्ट हाय परफॉर्मन्स येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये एकूण ११६ टीमने सहभाग घेतला होता त्यापैकी जवळपास ८६ टीम त्यासाठी पात्र झाले होते त्यापैकी १४ टीम एन्डुरन्ससाठी क्वालिफाईड झाल्या होत्या. या सर्वांमध्ये ऑर्किड कॉलेजच्या अश्वमेध संघाचा तृतीय क्रमांक आला.
या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या २८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. संघाने आपल्या कारचे डिझाइन फॉर्मुलाच्या नियमावलीनुसार तयार केले आहे. स्पर्धे दरम्यान टेक्निकल इन्स्पेक्शन, वेट टेस्ट, ॲक्सिलरेशन टेस्ट, नॉइस टेस्ट, ब्रेक टेस्ट आणि इतर विविध टेस्ट पार केल्यानंतर संघ अंतिम फेरीत, म्हणजेच एंड्युरन्स टेस्टसाठी पात्र ठरला.
फॉर्मुला आंतरराष्ट्रीय इम्पीरियलमध्ये संघाने ओव्हरऑल तृतीय क्रमांक पटकावला. डिझाइन रिपोर्टसाठी सी. व्ही. कॅटेगरी मध्ये प्रथम क्रमांक आणि सर्वात लोकप्रिय टीम म्हणून पुरस्कार मिळवला.
हे स्पर्धेसाठी सौरभ अलुरे ,ओंकार कुडते, प्रसाद भाकरे, आणि जयंत हबीब यांनी कॅप्टन, उपकॅप्टन, मॅनेजर आणि ट्रेझरर म्हणून काम केले तर या टीममध्ये रघुनाथ येमूल, सोहम गवळी, आशुतोष सरदेशमुख, प्रेरणा परवे, गणेश सालेगाव, निलेश सातपुते, शुभम चित्तार, अभिषेक बिल्ला, धवल जाधव, निहाल साकिनाळ, ओंकार ताकमोगे, स्नेहल शिंदे, जय गवंडी, नंदिनी गाजुल, भक्ती चव्हाण, सचिन म्हेत्रे, संजीवनी आदलिंगे, तेजस्विनी बोनाकृती, गिरीश पवार, विनय माद्रल, समर्थ सुतार, श्रीराज देशपांडे, धनश्री साळुंखे व प्रणिता कापसे हे सर्व मेम्बर म्हणून आपला सहभाग नोंदविला तर प्रोजेक्ट मार्गदर्शक म्हणून प्रा. बी. आर. बिराजदार आणि प्रा. आर. व्ही. संगा यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत यशस्वी होऊन तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महाविद्यालयाचे ट्रस्टी, कॉलेजचे मॅनेजमेंट टीम, प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉ. एस. एस. मेतन, उपप्राचार्य डॉ. व्ही. के. पत्की, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. एस. एस. काळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. टीमचे अभिनंदन करण्यासाठी व रथीनचे नवीन रुप रिव्हील करण्यासाठी प्रमुख पाहुणे इंडियन ऑईलचे प्रतिनिधी सुनील माहेश्वरी उपस्थित होते.
























