दक्षिण सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन तायक्वान्दो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी मंद्रूपची खेळाडू तनुजा नंदकुमार पवार हिने ५८ ते ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. तिची सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
याशिवाय या स्पर्धेत मंद्रूपचे खेळाडू प्रणाली उमण्णा व्हनमाने ४६ ते ४९ कांस्यपदक मिळविले. तर मुलांमध्ये यश अमोगसिध्द खंदारे याने ५४ किलो वजन गटात कांस्यपदक तसेच
शिवराज सोमनिंग बोळकवठे ५८ते ६३ या वजनी गटात रोप्यपदक मिळविले. सुवर्णपदक विजेती खेळाडू तनुजा पवार हिची सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
पंढरपूर येथील उमा महाविद्यालयात या तायक्वान्दो स्पर्धा पार पडल्या. पदक प्राप्त खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायक्वान्दो अकॅडमी मंद्रूपचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल
शिक्षक व मार्गदर्शकांचे दक्षिण सोलापूर तायक्वान्दो अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे, रेश्मा राठोड, दीपक धूळखेडे, सचिन कुंभार, सिध्दाराम विजापुरे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.























