नांदेड – किनवट तालुक्यातील इस्लापूर रेल्वे स्टेशन येथील श्री दत्त मंदिर येथे गावकर्यांच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून ते दिनांक ४-१२-२०२५ पर्यंत श्री गुरु चरीत्र पारायण व दत्त नाम सप्ताह व शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली आहे.
कथेचे शिव कथाकार श्री भीमाशंकर महाराज यांच्या अमृतवाणीतून ऐकवयास मिळत आहे.
सप्ताहातील दैनदिन कार्यक्रमाची रूपरेषा: सकाळी ७ ते १० श्री गुरुचरित्र पारायण ११ ते १ श्री दत्त नाम स्मरण (पारा) दुपारी १ ते ५ शिव महापुराण सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ रात्री ८ ते १० भजन जागर या प्रमाणे राहणार आहे. व दिनांक ४-१२-२०२५ रोज गुरुवार दत्त पौर्णीमा निमित्य सकाळी होम हवन श्री दत्त महाराजांची मूती स्थापना व कलशारोहण होइल नंतर लगेच
श्री.ह.भ.प.माऊली महाराज पुंगळकर धामणगाव (सेलु) यांचे काल्याचे किर्तन होईल परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

























