नायगाव / नांदेड – जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत समाजातील अंधश्रद्धा, गैरसमज आणि एड्सग्रस्तांविषयीचा भेदभाव दूर करण्याचा स्तुत्य उपक्रम नरसी येथील कै.गोपीनाथ राठोड नर्सिंग कॉलेज तर्फे राबविण्यात आला.
श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मरवाळी तांडा येथील माध्यमिक आश्रम शाळेत भव्य प्रांगणात उपस्थित विद्यार्थ्यांसमोर प्रभावी पथनाट्य सादर करून जन जागृतीचा ठसा उमटविला.
कॉलेजचे प्राचार्य अशोक राठोड यांच्या नेतृत्वाखाली सह शिक्षिका कुमारी मेघा सूर्यवंशी, शिक्षक आदित्य मधूकर राठोड, वैभव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये विक्रम आडे, मुजफ्फर शेख, रूपेश राठोड, प्रिया पांचाळ, कविता नारलानाड, ऐश्वर्या राठोड, अरुणा ढेपाळ, आरती चव्हाण, दिपिका चव्हाण, श्रावणी पांचाळ, मयुरी पवार, दिपाली पवार, क्रांती शिंगणे, प्रियांका हानवटे, नागेश वगवाड, पांडुरंग सुरेवाड, बाबुराव देवदे, शुभम गायकवाड, शैलेश घंटेवाड, शिवराज, आरती चव्हाण, दिपाली पवार आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या पथनाट्यातून एड्स ग्रस्त व्यक्तींवरील भेदभाव अयोग्य असून त्यांना समाजात समान स्थान देणे गरजेचे आहे, असा संवेदनशील संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला. तसेच एड्सची प्रतिबंधक काळजी, योग्य माहिती आणि सुरक्षित वर्तनाबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनी भरभरुन दाद दिली तर प्रेक्षकांनी या उपक्रमाचे भर भरून कौतुक केले.
कार्यक्रमाला माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य विजयकुमार देशमुख, सहशिक्षक सूर्यकांत जाधव, आनंदराव सूर्यवंशी, नागनाथ येलूरे, संभाजी मेहेत्रे, व्यंकट रेकूळवाड, सुरेश पवार, सुभाष राठोड महेंद्र सारवले,शिवराम राठोड,सुभाष कदम, एकनाथ मुनगीलवार,फेरोज शेख दिपक बि-हाडे,तसेच पोस्ट बेसिक ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक पांडुरंग येवले, उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा.गणेश मारताळेकर,प्रदीप लापशेटवार, शिव शंकर कोरे, दिलीप माने,गजानन श्रीरामे सह, चतूर्थ कर्मचारी हाणमंत सिंगवाड, बालाजी राठोड सह,अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पथनाट्य कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंकर राठोड यांनी केले.
अशा प्रकारचे उपक्रम समाजातील गैरसमज दूर करून आरोग्य जागरूकतेची बीजं पेरतात, असा सार्वत्रिक निष्कर्ष उपस्थितांनी व्यक्त केला.

























