मुखेड / नांदेड – बहुतांश नागरिकांचे खाणीमान व राहणीमान बदलल्याने च मुखेड तालुक्यांसारख्या डोंगराळ भागातील मेहनती नागरिकांनाही हृदयविकारांचे आजार उद्भवत आहेत. छातीमध्ये दुखत असताना अनेक रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक तज्ञ डॉक्टरांकडे न जाता ग्रामीण भागात घरगुती उपाय करताना दिसून येत आहेत यामुळे त्यांच्या जीवनात धोका होत आहे . सामान्य लोकांनी हृदय रोगाची लक्षणे वेळीच ओळखणे,नातेवाईकांनी अशा व्यक्तीला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.
CPR म्हणजे जीवन संजीवनी ह्या आपत्कालीन प्रथमोपचार ची माहिती सर्व जनतेस विशेषतः तरुण वर्गास असणे आवश्यक झाले आहे. असेही आवाहन मुखेड शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक कौरवार यांनी नागरिकांना केले .त्यांनी त्यांच्या रुग्णालयात एकाच दिवशी चार हृदयरोगी रुग्णांना जीवदान दिले आहे यावेळी ते बोलत होते.
मुखेड तालुका डोंगराळ भागाने वेढलेले असल्यामुळे या भागातील बहुतांश ग्रामीण भागातील नागरिक मेहनती व कष्टाळू निरोगी म्हणून ओळखला जातो मात्र आता ही ओळख पुसल्या जात असून शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांचे आणि मान व राहणीमान यामुळे मोठ्या प्रमाणावर हृदयविकाराचा धोका वाढला असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. मुखेड शहरातील रुग्णालयात दररोज हृदयविकारांचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत .
शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, मुखेड चे हृदयराज,डॉक्टर अशोक कोरवार यांच्या रुग्णालयात एकाच दिवशी तब्बल चार रुग्ण हृदयविकाराच्या गंभीर आजाराने मृत्यूच्या दारात उभे असताना उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले यावेळी चारही रुग्णावर योग्य उपचार डॉ. अशोक कौरवार यांनी केला व त्यांना पुढील अंजॉग्रफी साठी नांदेडला पाठविण्यात आले. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्याने या रुग्णांना जीवदान मिळाले. मात्र ग्रामीण भागात रुग्णाच्या छातीत दुखत असताना तो रुग्ण गावातीलच एखाद्या सलाईन इंजेक्शन देण्याची थोडी माहिती असलेल्या अशिक्षित व्यक्तीकडे जाऊन उपचार घेत आहेत यातून त्यांची प्रकृती गंभीर होत चालली असून शेवटच्या क्षणी ते मुखेड शहरातील रुग्णालय गाठत आहेत . डॉक्टर अशोक कौरवार यांनी सांगितले की नागरिकांनी योग्य आहार व दररोज शारीरिक व्यायाम केल्यास हृदयविकाराच्या धोका टाळता .
पोटाच्या वरच्या भागात तुम्हाला सतत त्रास होत असल्यास किंवा अचानक दुखणे वाढले असल्यास तात्काळ तुम्ही तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा कदाचित तो हृदयरोगाचा धक्का सुद्धा येण्या अगोदर संकेत असू शकतात. यासाठी नागरिकांनी सतर्क राहून वेळेत उपचार करून घ्यावेत तसेच नियमित आपली शारीरिक तपासणी करून घ्यावीत. आहारामध्ये सर्वात उत्तम आहार म्हणजे शाखा आहार, जंक फूड, चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळल्यास आपण हृदय रोगापासून दूर राहू शकतो तसेच इतरांशी स्पर्धा व तुलना करीत राहिल्यास आपल्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो यातूनही हृदयरोग वाढू शकतो .
याचबरोबर सदाचार ही निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे हृदयरोगी रुग्णांनी सॉर्बिट्रेट ची गोळी नेहमी सोबत ठेवावी. शरीरात झालेले बदल जसे वाढलेले वजन थकवा चालल्यावर दम येणे छाती भरून येणे अंगावर सूज येणे हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त होणे याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये तसेच मधुमेह व रक्तदाब नियंत्रित ठेवावा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. एके दिवशी चार रुग्णाला जीवदान दिल्यानंतर ते वार्ताहरणशी बोलत होते यावेळी हरी पाटील , शहाजी राकुरे व संजय रिंदकवाले हे प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते


























