वाघी / परभणी – येथे 2024-25 मध्ये मानवविकास अंतर्गत विद्यालयात ये – जा करणाऱ्या 24 मुलींना मोफत सायकल मंजूर झाल्या होत्या आज विद्यालयाचे संस्थाअध्यक्ष प्रभाकर पाटील वाघीकर यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले .
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष साखरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच संतोष बडवणे,जवळा येथील माजी सरपंच दिलीपराव माने,राजेभाऊ बोबडे,शेख रफिकभाई, गंगाधर रेंगडे,अतुल माने, बालासाहेब हारकल, विठल बोथे जमदाडे, शिनगारे, सवडकर इत्यादी पालकांची उपस्थिती होती.
सूत्र संचालन सोंनपा धुळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दामोदर सरगर सर यांनी मानले तर ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.त्यानिमित्त त्यांचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्या साठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी सहकार्य केले.


























