मुंबई – युनिफॉर्म गारमेंट एक्झिबिशनची संकल्पना ज्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला व युनिफॉर्म क्षेत्रात नवनवीन उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशाने सुरू केलेल्या प्रदर्शनाची मूळ संकल्पना ज्यांनी मांडली त्यांना भारतातील पहिला “युनिफॉर्म रिव्होल्यूशनरी पर्सन ऑफ इंडिया” अवॉर्ड मफललाल इंडस्ट्रीजचे सीईओ एम. बी. रघुनाथ यांना माजी वस्त्रोद्योग मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले असल्याचे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी सांगितले.
मुंबई गोरेगाव येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यावेळी म्हाडाचे वित्त व्यवस्थापक अजय सिंग पवार उपस्थित होते. युनिफॉर्म हे “युनिटी” म्हणजे “एकीचे” प्रतीक आहे. आणि तशी संकल्पना मांडणारे पण ते पहिले व्यक्तिमत्व म्हणून एम. बी. रघुनाथ यांचेच नाव पुढे येते.
या प्रदर्शनामुळेच नवनवीन ग्राहक प्रत्येक गारमेंट उद्योजकाला जोडले जातील त्यामुळे प्रत्येकाचा व्यवसायात वाढ होऊन प्रत्येकाची क्रयशक्ती वाढेल असे क्रांतिकारी विचार त्यांनीच मांडले होते. त्यामुळेच त्यांना हे मानाचे अवॉर्ड देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शननुसार आम्ही गेली नऊ(०९) वर्षे एक्जीबिशन यशस्वीरित्या भरवीत आहोत.
गेली वीस (२०) वर्षापासून ते युनिफॉर्म इंडस्ट्रीत काम करीत आहेत. आणि युनिफॉर्म संदर्भात ते सतत मार्गदर्शन करतात. आज संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार(१०००) उद्योजक आणि वीस हजार(२००००) रोजगार युनिफॉर्म गारमेंट क्षेत्रात निर्माण झालेले आहेत.
युनिफॉर्म गारमेंट ट्रेंड आणि यामध्ये नवीन नवीन डिझाइन्स कसे येऊ शकतात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. केवळ स्कूल युनिफॉर्म कडेच लक्ष न देता कार्पोरेट सेक्टर, हॉस्पिटल्स, बँका अशा विविध क्षेत्राकडेही त्यांनी जातीने लक्ष दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य अजय रंगरेज निलेश शहा, विजय डाकलिया, केतुल शहा, सतीश पवार, श्रीकांत अंबुरे, प्रकाश पवार, सुनील मेंगजी यांनी प्रयत्न केले.

























