बार्शी – राज्यपाल कार्यालयातर्फे ४ ते ८ डिसेंबरदरम्यान २७ व्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार आहेत. स्पर्धेसाठी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संघात निवड झाली आहे.
यामध्ये समीना मुलाणी, सृष्टी गवळी यांची महिला खो-खो संघात तर अनिकेत सावंत याची पुरुष खो-खो संघात निवड झाली. संघाचे सराव शिबिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सुरू आहे.
वेदश्री बंडेवार व अर्पिता शिंदे यांची महिला बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. संघाचे सराव शिबीर बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात सुरु आहे. अरबाज शेख याची लांब उडीसाठी निवड झाली आहे. संघाचे सराव शिबीर
डी. बी. एफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर येथे सुरु आहे. या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय यादव, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, प्रमोद जाधव, संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर, डॉ. रामहरी नागटिळक, प्रा. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

























