सोलापूर – स्वरक्षणाचे हे फक्त शारीरिक नसून ते विविध पाच स्तरावर करावयाचे असते. प्राप्त परिस्थितीत मनोबल खचू न देणे प्रसंगावधान इत्यादी गोष्टी ही स्वरक्षणाचाच भाग आहेत. अशी माहिती ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक माननीय श्रीमती संगीता जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिली.
ए. जी. पाटील अभियांत्रिकीच्या संगिनी वुमन्स फोरम तर्फे विद्यार्थ्यांसाठी स्वरक्षणाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
ही स्वरक्षण कार्यशाळा मुले आणि मुली या दोघांसाठीही आयोजित करण्यात आली होती.
प्रथम श्रीमती संगीता जाधव यांनी स्व आणि संरक्षण यांचा अर्थ विषद केला. संरक्षण हे फक्त शरीराचे नसून मन,बुद्धी,भावना यांचेही असते असे विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक श्री मिहीर जाधव व शिष्य हे उपस्थित होते.
श्री मिहीर जाधव यांनी प्रात्यक्षिकांद्वारे हाताची पकड सोडविणे, आक्रमणापासून बचावात्मक हालचाली, शारीरिक संतुलन राखणे तसेच धोका ओळखण्यासाठी आवश्यक परिस्थिती ज्यांनी जागरूकता इत्यादी सराव करून घेतला. तसेच संभाव्य संकट परिस्थितीत शांत मनाने आणि योग्य निर्णय क्षमता वापरत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत ही मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
संस्थेचे अध्यक्ष श्री एस. ए. पाटील व संस्था सचिव श्री शिवानंद पाटील हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही असतात त्यामुळे अशा कार्यशाळा वारंवार आयोजित केल्या जातात अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर एम.ए.चौगुले यांनी दिली तर अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर एकाग्रताही वाढते असे मत प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगिनीच्या चेअरमन प्रा.डी.ए.जव्हेरी, प्रा. एस.एन. कांबळे प्रा.आर.एस. कटनळळी, प्रा.ए.जी. घाळीमठ यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन प्रा. एस. के. कोनापूरे यांनी केले.
*फोटो ओळी:- याप्रसंगी श्रीमती संगीता जाधव यांच्या समवेत कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार,संगिनीच्या चेअरमन प्रा.डी.ए.जव्हेरी व प्राध्यापिका वर्ग*
























