बार्शी – केशवराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, धाराशिव यांच्यावतीने २९ नोव्हेंबर रोजी आयोजित पहिली राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात पार पडली. विविध फार्मसी महाविद्यालयांमधून विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या स्पर्धेत सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खंडवी येथील डी. फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थी रिया बाबासाहेब योगे आणि सिमरन इब्राहीम शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या विद्यार्थिनींनी *मेडिकेशन एरर अँड प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी* या महत्त्वपूर्ण विषयावर आकर्षक, माहितीपूर्ण व वैज्ञानिक मांडणी करुन परीक्षकांची प्रशंसा मिळवली. त्यांच्या सादरीकरणामध्ये औषधांच्या चुका कशा होत असतात, त्यांचे रुग्णांवर होणारे दुष्परिणाम तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांचे सुटसुटीत आणि प्रभावी विवेचन करण्यात आले. सदर विद्यार्थिनी महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ. स्वप्नील पौळ यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे, संस्थेचे अध्यक्ष अरुणदादा बारबोले व सचिवा कल्पनाताई बारबोले यांनी अभिनंदन केले.

























