वसमत / हिंगोली – नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर करत २ डिसेंबरचे घोषित मतदान पुढे ढकलण्यात आले असून, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २१ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. या संदर्भातील प्रसिद्धीपत्रकाने संपूर्ण शहराचे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी काही उमेदवारांनी घेतलेल्या न्यायालयीन धावणीचा निकाल २५ डिसेंबर रोजी लागला, मात्र जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीवर स्थगिती प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण निवडणूक यादीत वसमतचा कोणताही उल्लेख नसणे हे विशेष ठरले.
३० नोव्हेंबर रोजी सर्वच पक्षांचे नेते व उमेदवार गोंधळून गेले होते. दिवसभर उपविभागीय कार्यालयातून माहिती घेण्याची धांदल उडाली. त्या दरम्यान व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या.
सायंकाळी अचानक ६ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून मतदान व मतमोजणीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. त्यात 20 डिसेंबरला मतदान होईल 21 डिसेंबरला मतमोजणी होईल असे प्रसिद्धी पत्र काढले या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाईकवाडे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. न्यायालयीन निर्णय त्यांच्या बाजूने लागला असला तरी, नामनिर्देशन मागे घेण्यासाठी किंवा प्रचारासाठी त्यांना वेळच मिळाला नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन दिले त्यात नमूद आहे की ह्या सर्व प्रकारामुळे लोकशाही मधील निवडणुकीवरचा विश्वास उडत चाललेला आहे यामुळे दोषीविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावे असे निवेदनात नमूद आह व अनावश्यक विलंब कमी करण्याची मागणी केली. तसेच हा विलंब वसमतच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमुळे झाले असल्याचा आरोप राजकीय नेत्याकडून होत आहे.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी अधिकच वाढली असताना उमेदवारांनी केलेला प्रचारखर्च आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेत राहूनच करावा लागणार आहे. परंतु मतदानाची नवीन तारीख निश्चित झाल्यामुळे प्रशासनावर आता उमेदवाराला अजून वेगळा खर्चाबाबत काही सूट किंवा मार्ग काढणार का? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
या सर्व घटनाक्रमामुळे निवडणूक प्रक्रियेवरच संशयाची छाया निर्माण झाल्याचे मानले जात असून, वसमतच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. हे सर्व घडले असता परंतु असंख्य निवडणुका लढणाऱ्या वसमत येथील ज्येष्ठ व्यक्ती नाईकवाडे हे मात्र चर्चेत आले आहे हे मात्र विशेष नगराध्यक्ष पदाकरिता भरण्यात आलेल्या यांच्या नामनिर्देशक अर्जाचा विचार वसमत येथील निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी केला होता का? अशा उलट सुलट चर्चा सुरू आहे

























