वसमत / हिंगोली – नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पूजा देवानंद नाईकवाडे याचा अर्ज निवडणूक अधिकारी यांनी नामजूर केल्यामुळे त्यांनी 20/11/2028 रोजी अपील दाखल करण्यात आले होते त्या अपींलांवरील निकाल दि.२२/११/२०२५ रोजी पर्यंत होणे आवश्यक होते जेणेकरुन संबंधित उमेदवारास त्याचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम-१९६६ मधील नियम १७ (१) (ब) नुसार तीन दिवसाचा कालावधी मिळाला असता व त्यानंतर दि.२६/११/२०२५ रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारास निवडणूक चिन्ह वाटप करणे नियमानुसार योग्य ठरले असते, परंतु वसमत नगरपरिषदा, संदर्भात
अपीलाचा निकाल 24/11/2025 रोजी लागल्याने
संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अशा उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र माघारी घेणेसाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केले त्यामुळे अशा प्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दि.२६/११/२०२५ किंवा त्यांनतर केलेली चिन्ह वाटपची कार्यवाही नियमबाह्य ठरते.
जिल्हा न्यायालयातील दाखल प्रकरणात दि.२३/११/२०२५ रोजी किंवा तद्नंतर आदेश पारित झालेल्या प्रकरणात नियमांचे पालन झाले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले असल्यामुळे
अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या फक्त संबंधित सदस्यांच्या जागेकरीता आणि अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष पद असल्यास संपूर्ण नगरपरिषद नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी सद्या सुरु असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. अँड.सौरभ दिनेश लोलगे अँड शेख फय्याज























