औंढा / हिंगोली – :औंढा तालुक्यातील पेरजाबाद गावात बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवून मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दलची तक्रार तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता निवेदनाद्वारे पेरजाबाद येथील ग्रामस्थांनी केली आहे.
येणाऱ्या काही काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये पेरजाबाद हे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. परंतु गावांमध्ये अनुसूचित जमातीचे लोक राहत नाहीत. जवळा बाजार येथील विजय प्रकाश पवार हे गावातील काही लोकांना हाताशी धरून ते मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी बीएलओकडे बनावट कागदपत्रे बनवून सादर करीत आहेत.
बनावट कागदपत्राची योग्य तपासणी करून विजय प्रकाश पवार यांचे नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट करू नये व बनावट कागदपत्रे तयार केले म्हणून योग्य ती कारवाई आणि चौकशी करण्याची मागणी पेरजाबाद येथील हरिश्चंद्र आव्हाड , पंढरीनाथ वाघ ,कन्हैया आव्हाड ,गंगाधर जाधव ,श्रीरंग आव्हाड, कुंडलिक मात्रे , पिराजी जाधव , संदीप वाघ ,दत्तराव जाधव, हनुमान जाधव,बबन सांगळे,गोपाल वाघ ,एकनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर जाधव, राहुल जाधव, मारुती आव्हाड, माणिक वरकड, जगन्नाथ मात्रे, बालासाहेब जुमडे, रितेश वाघ ,भागवत मात्रे, जगन्नाथ जाधव, नवनाथ जुमडे, दिपाजी मात्रे, परमेश्वर सांगळे, रमण सांगळे, चांदू मात्रे ,राघोजी आव्हाड ,साहेबराव जाधव, यांच्यासह पेरजाबाद येथील ४१ ग्रामस्थांनी केली आहे.
औंढा नागनाथ: तालुक्यातील पेरजाबाद येथील ग्रामस्थांनी निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांना दिले आहे.

























