माळशिरस – कंटेनरच्या धडकेत मोटर सायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी माळशिरस बाय पास ला यादव पेट्रोल पंपासमोर घडली असून माऊली संभाजी गायकवाड ,( वय २९ वर्षे,उंबरे वेळापूर)असे आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की उंबरे वेळापूर येथील माऊली गायकवाड हे मोटार सायकल न एम एच ४५ बी २७३८ या दुचाकी वरुन माळशिरस वरून सदाशिवनगर कडे चालले असता यादव पेट्रोल पंपासमोर सर्विस रोड वरून महामार्ग रस्त्यावर वळल्या नंतर बाय पासने सदाशिवनगर कडे चाललेल्या कंटेनर न केए.५१ एके.८१३२ ने जोरात धडक दिली.यामध्ये मोटर सायकल चालक माऊली गायकवाड जागीच ठार झाले. याबाबत माळशिरस पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पो कॉ. आर एम वाघ तपास करीत आहे.
माळशिरस नजिकच्या ६१ फाटा, यादव पंप,या ठिकाणी सातत्याने अपघात होऊन अनेकाना जिव गमवावा लागत आहे.वास्तविक पाहता या ठिकाणी ओव्हर ब्रीज किंवा अंडर पास मार्ग होणे आवश्यक आहे.

























