नाशिक – क्रीडा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 98 किलो वजन गटांमध्ये छत्रपती शिवाजी साय कनिष्ठ महाविद्यालयाच्या इरफान यासीन बालगीत याने सुवर्ण पदक संपादन केले.
त्याने आपल्या गटात सर्वोत्कृष्ट क्लीन अँड जर्क 120 kg आणि मॅच 90 kg वजन यशस्वीरित्या लिफ्ट केले. त्याच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीनंतर त्याची क्रीडा संचलनालय याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ,
त्याला वेटलिफ्टिंग संघटनेचे मार्गदर्शक श्री रविंद्र माळी, श्री प्रदीप पाटील त्याचे वडील यासीन बारगीर , प्रा संतोष गवळी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड, श्री मारुती घोडके, नितीन गोरे, प्रशांत राणे, दत्ता सुतार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
इरफान बारगीर चे वडील यासीन बारगीर हे अतिशय कष्टातून आपल्या मुलाला उत्कृष्ट क्रीडापटू तयार करण्यासाठी आवश्यक ती सोयी साधने व त्याचा डायट यासाठी प्रयत्न करत आहेत,
इरफानच्या या यशस्वी कामगिरीसाठी मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे सचिव प्रा महेश माने प्राचार्य सौ मंजुश्री सपाटे पाटील व सर्व प्राध्यापक प्राध्यापके तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

























