सोलापूर – महाराष्ट्र राज्य,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे कडून जिल्हास्तरीय आयडॉल टीचर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये श्री शिवाजी विद्यालय, कारी ता. बार्शी शाळेचे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक महंमद शेख यांची सोलापूर जिल्हास्तरीय आयडॉल टीचर म्हणून निवड शालेय कार्य गुणवत्तेनुसार करण्यात आली आहे. सदर आयडॉल टीचर निवड सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे आदेशान्वये करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य विद्यार्थी विकासाकऱीता योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे. जिल्हास्तरीय निवड झालेल्या राज्यातील आयडॉल शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजन गुरुवार दि.०४/१२/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. या आयडॉल शिक्षक एकदिवसीय कार्यशाळेत आयडॉल शिक्षक यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
आयडॉल टीचर निवड झाले बद्दल महंमद शेख यांचे संस्था अध्यक्ष मनोहर सपाटे,शिक्षण तज्ञ माजी प्राचार्य डॉ. ह. ना. जगताप,संचालक ज्ञानेश्वर सपाटे, बार्शी गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटकें,कारीचे सरपंच नीलम कदम, उपसरपंच खासेराव विधाते, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोसले, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

























