राष्ट्रवादीचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा सोलापूर शहर व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रेल्वे स्टेशन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत आमदार आव्हाड यांचा निषेध नोंदवण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष विक्रम देशमुख रुद्रेश बोरामणी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे वैभव बिराजदार शिवानंद कावडे प्रेम भोगडे सिद्धार्थ मंजेल्ली राम वाकसे अनिल कंदलगी , बाबूराव संगेपान , नारायण आसादे , संदीप दुगाने , आकाश सरवदे ,मल्लिकार्जुन पाटील , शिवराज पवारजाकीर सागरी नागेश खरात भाजपा सोलापूर शहर सर्व प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.