सोलापूर : सोलापुरातील विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ईरा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश नारायणकर यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाचे अधिकारी राजू ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली. आर्थिक प्रगतीपासून वंचित राहिलेल्या सर्वसामान्य नागरिक व व्यवसायिकांना बचतीची सवय लावून आर्थिक सक्षम करण्यासाठी ईरा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे चेअरमन सुरेश नारायणकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चेअरमन सुरेश नारायणकर यांनी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित केल्या. उपाध्यक्षपदी बांधकाम व्यवसायातील तज्ञ अजयकुमार परांडेकर यांची तर सचिवपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी ईरा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळातील जनसंपर्क संचालक, जागृती प्रकाशनचे प्रमुख विजय गायकवाड, बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर डेव्हलपर सागर नारायणे, तज्ञ संचालक सुधीर सुटनकर, संचालिका रेणुका मोटे, अंबिका तोरणे, धनश्री कदम, मीनाक्षी कटके यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ईरा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या ॲडमिन एक्झिक्युटिव्ह स्नेहा साळुंखे, मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह श्रीशैल लवंगे, ऑफिस स्टाफ हफिजा मुलाणी, आरती लवंगे आदी उपस्थित होते.

























