सोलापूर : भारतीय संविधान दिनाच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान च्या वतीने सांगली जिल्ह्यातील जत येथील धम्मभूमी बुद्धविहार येथे भव्य सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सहलीस प्रस्थान करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे उपस्थित सर्व नागरिकांनी त्रिशरण–पंचशील ग्रहण केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सहलीचा शुभारंभ करण्यात आला. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते एस.टी. बसेसना निळा झेंडा दाखवून सहलीस औपचारिकरित्या सुरुवात करण्यात आली.या सहलीत मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील सुमारे १२०० महिला व ४०० युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामाजिक, सांस्कृतिक व धम्मविचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने ही सहल अत्यंत प्रेरणादायी ठरली.
सहलीदरम्यान धम्मविचार, सामाजिक बांधिलकी आणि संविधान मूल्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर, महादेव बाबरे, अजित गायकवाड, पिंटू ढावरे, शाहीर लोंढे, महादेव वायदंडे मल्लीनाथ रामशेट्टी अक्षय थोरात, शरणू हजारे, गजानन होटकर यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

























