मुक्रामाबाद : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित 2025, सत्तावीस वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव चार ते आठ डिसेंबर 2025 या कालावधीत संपन्न होत आहे. त्यानिमित्त विद्यार्थी जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाकडून क्रीडा ज्योत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 03 डिसेंबर 2025 रोज बुधवार दुपारी ठीक 12:05 वाजता स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात या रॅलीचे आगमन झाले.
या रॅलीचे आगमन होताच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ मा.म. गायकवाड आणि महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी या रॅलीचे व विद्यापिठाकडून आलेल्या सर्वाचे स्वागत केले. क्रीडा ज्योत रॅलीचे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ मारुती गायकवाड यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची (नशामुक्तीची) शपथ देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना डॉ मारुती गायकवाड यांनी क्रीडा ज्योत रॅलीच्या आयोजनामागील हेतू सांगितला.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाविषयी जागृती व्हावी या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच लातूर जिल्ह्याचे समन्वयक प्राध्यापक डॉ होकर्णे सर यांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक या रॅलीच्या स्वागतासाठी उपस्थित होते. सुरुवातीला डॉ एकनाथ भिंगोले यांनी मशाल हाती घेऊन महाविद्यालयाच्या मंचापर्यंत रॅलीला घेऊन गेले. त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि स्टॉप ने रॅलीत सहभागी होऊन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर रॅलीला पाठवण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ आर. बी. मादळे यांनी केले तर आभार संस्कृतीक विभागप्रमुख डॉ आर. बी. बाविस्कर यांनी मानले.






















