नांदेड – नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन व आरटीओ कार्यालय आणि ट्राफिक पोलिसांनी एकत्र कारवाई करून ४७ वाहनाची तपासणी करून ४५ हजार रुपये दंड व त्यातील ३ वाहने जप्त करण्यात आली आहे. ही कार्यवाही दिनांक दोन डिसेंबर रोजी सिडको परिसरातील पीव्हीआर मॉल नवीन कवटा या ठिकाणी करण्यात आली. यावेळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी वाहन चालकास चांगले धारेवर धरल्याचे दिसून येते.
नवीन कवठा येथील पीव्हीआर मॉल समोरील चौरस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालू मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने या ठिकाणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे व आरटीओ कार्यालय आणि इतवारा ट्राफिक पोलीस त्यांनी येथून ये -जा करणाऱ्या वाहनाची तपासणी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैद्यरित्या वाहनातून नियम बाहेर चालवणारे चालकावर कारवाई करण्याची मोहीमच राबवली आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीत बरेच वाहने कागदपत्राशिवाय व तसेच अवैद्यरित्या वेगात फालकावर क्षमते शिवाय जास्त माल भरून वाहने चालवुन नियमाचे उल्लंघन करीत असल्यामुळे बरेच अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आरटीओचे अधिकारी अमर पायघन व ट्रॅफिक पोलीस इतवारा गणेश शिंदे, अमित कवठेकर, मेखलवाड तसेच नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधर भालेराव, शेख इब्राहिम, नितीन मुसळे, मुपडे, मोरे यांनी सर्वांनी एकत्र कारवाई करून अवैद्य रीत्या रेती व इतर मालवाहक वाहनावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आल्याने परिसरात या मोहिमेचा मोठा धसका वाहन चालकास बसल्याचे दिसून येते.
या सदरील कारवाईमुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

























