लातूर – असंख्य भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरामुळे रेणापूर तालुक्यातील मौजे गोविंदनगर येथे वैभव प्राप्त झाले आहे. अनेकांच्या बोली भाषेत गोविंदनगर असून शासकीय कागदोपत्री आजही माणूसमारवाडी असेच गावचे नाव आहे माणूस मारवाडी ऐवजी गोविंद नगर हेच अधिकृत नाव व्हावे यासाठी शासकीय पातळीवर प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांनी दिली.
रेणापूर तालुक्यातील मौजे गोविंदनगर येथील श्री बालाजी मंदिर परिसरात लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या भव्य सभागृहाचे भूमिपूजन युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, मंडलाध्यक्ष महेंद्र गोडभरले, शरद दरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष अमर चव्हाण, माजी जिप सदस्य सुरेंद्र गोडभरले, वसंत करमोडे, लक्ष्मण यादव, पुंडलिक सुडे, शिवाजी मद्दे, अजय शेळके, पांडुरंग कलूरे, सुरेश बुड्डे, नारायण राठोड, भगवान सुडे, बाबासाहेब शिंदे, लालासाहेब जाधव यांच्यासह इतर अनेकांची प्रमुख उपस्थित होती. ऋषिकेश दादा यांचे गोविंद नगर येथे आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना युवा नेते ऋषिकेशदादा कराड म्हणाले की, सत्ता असो अथवा नसो सतत जनतेची सेवा करण्याची भूमिका रमेशआप्पा साहेबांची असून समाजाचे काहीतरी देणे लागते या भूमिकेतून सातत्याने काम करतात. लातूर ग्रामीण मतदार संघातील मतदारांनी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली या संधीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विकासाची गंगा निर्माण झाली असेल शासनाच्या विविध योजनेचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न असल्याचे बोलून दाखवले.
रेणापूर तालुक्यावर विशेष लक्ष असून रेणापूरचा विकास करणे म्हणजे मुंडे साहेबांची सेवा केल्याप्रमाणे आहे अशी भूमिका घेऊन काम करणारे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून गोविंदनगर येथील मुस्लिम बांधवांच्या समशानभूमीच्या विकासासाठी आणि देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही देऊन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला साथ द्या आणि गावच्या परिसराच्या विकासाला गती द्या असे आव्हान ऋषिकेशदादा कराड यांनी केले.
रेणापूर तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत भाजपाला मताधिक्य देणारा खरोळा जिल्हा परिषद मतदार संघ असल्याचे सांगून मुंडे साहेबांचा राजकीय वसा आणि वारसा जोपासणारे लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी गोविंद नगर सह मतदार संघातील प्रत्येक गावागावात वाडी वस्तीत विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले यांनी सांगितले तर मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले यांनी दर शुक्रवारी गोविंदनगर येथील बालाजी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते, महाप्रसाद तयार करण्यासाठी होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आमदार रमेशआप्पांच्या माध्यमातून स्वयंपाक घर बांधण्यात आले, आज भव्य सभागृहाचे भूमिपूजन झाले. गोविंदनगर गावात आजपर्यंत जे काही कामे झाली ती केवळ भाजपामुळेच झाली तेव्हा गावच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी भाजपाला साथ द्या असे आव्हान आपल्या प्रास्ताविकातून केले.
प्रारंभी युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांचे बालाजी मंदिर ट्रस्ट आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने यथोचित सत्कार करून स्वागत केले. यावेळी राजाभाऊ लोमटे, आबासाहेब चव्हाण, पांडुरंग बिडवे, सुभाष जाधव, गोविंद चव्हाण, शिवाजी उपाडे, बाबू शेख, पांडुरंग बिडवे, दशरथ शिरसाट, वामन अहिरवाड, गोविंद नरवटे, मौला शेख, विलास जाधव, ज्ञानोबा बिडवे, सुभाष शिरसाट, भरत लोमटे, कृष्णा नरवटे, तानाजी शिंदे, चांदपाशा शेख, अजीम शेख, रमजान पठाण, बालासाहेब जाधव, दशरथ चव्हाण, सुधाकर चव्हाण यांच्यासह या कार्यक्रमास ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























