अंबड / जालना – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे आद्य क्रांतीवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 249 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक येथे महापुजा आयोजित करण्यात आली होती.यावेळी रामभाऊ लांडे,सौ.सुवर्णा लांडे,सौ.संगिता मैंद,भगवान मैंद,राजेंद्र लबासे,सौ.उर्मिला लबासे, गणेश लोहकरे,रामदास सागुते,राजुदेवा खुंटेफळकर उपस्थित होते.
अंबड शहराला होळकर राजघराण्याचा राजाश्रय लाभलेला असुन सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीत अंबड शहराच्या विकासाची पायाभरणी होवून अंबिका देवी मंदिर, खंडोबा बिल्केश्वर मंदिर, महादेव मंदिर,अहिल्यापुरा,नागोबा वेस,शहागड वेस,जालना वेस निर्माण कार्य तसेच पुष्कर्णी, कांवदी,महाद्वारी, मोती बारव जीर्णोद्धार संपन्न झाले होते. पुजारी खुंटेफळकर,सबनीस व गुरव महत्त्वाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात.



























