सोयगाव – तालुक्यातील कंकराळा येथील प्रगती जिनिंग प्रेसिंग येथे सीसीसाय (भारतीय कपास निगम लिमिटेड ) यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा.गाढे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे,केशवराव तायडे, सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पा.दाभाडे, उपसभापती संदीप राऊत,धरमसिंग चव्हाण,गोपी जाधव,सीसीआय केंद्राचे संचालक के.पी. मीना,शुभदीप खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कंकराळा येथील सीसीआय केंद्रामुळे शेतकऱ्यांचा कापूस शासनाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी होणार असून यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबणार असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.सोयगाव येथे जिनिंग प्रेसिंग तसेच सीसीसाय केंद्र सुरू व्हावे ही येथील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती.देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा येथे जिनिंग ची स्थापना व सीसीसाय ची खरेदी होत आहे.या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले. तसेच प्रगती सह.जिनिंग प्रेसिंग ही शेतकऱ्यांच्या मालकीची जिनिंग प्रेसिंग असून ही जिनिंग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसज्ज व्यवस्थेसह परिपूर्ण आहे.शेतकऱ्यांनी पूर्व नोंद करून या कापूस खरेदी केंद्रावर पाठवावे असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शेतकरी सतीश गजानन बिंदवाल रा.तिडका,गजानन लक्ष्मण ढगे रा. आमखेडा तसेच ट्रॅक्टर चालक कृष्णा संजय ढाकरे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी केले, सूत्रसंचालन संतोष बोडखे यांनी तर शेवटी विलास वराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास दारासिंग चव्हाण,कुणाल राजपूत,राधेश्याम जाधव,शेख सलीम, भारत तायडे,अक्षय काळे,राजू दुतोंडे,कदिर शहा,हर्षल काळे,संदीप सुरडकर,भगवान जोहरे,गजानन कुडके,अतिश ताठे,दिलीप देसाई,मेघराज राठोड,आत्माराम पवार,बद्री चव्हाण,इब्राहिम देशमुख,नाजीम पठाण,नारायण राठोड, सांडू राठोड,अविनाश पाटील,मुबारक शेख,फिरोज पठाण, डॉ.देशमुख,रवींद्र परदेसी,शरद पाटील,समाधान तायडे, शिवप्पा चोपडे,मोहन सुरडकर,देविदास राजपूत,छोटेसिंग राजपूत,भारत राठोड,विश्वास चव्हाण,शेख जाकीर,शेख मुख्तार,उस्मान पठाण,मेहबूब खान,अयुब खान,नवाब खान, भीमराव बोराडे,अजीम सय्यद,प्रवीण कदम,गजानन ढगे, सिराज पठाण,खंडू पाटील ,राजमल पवार आदींची उपस्थिती होती.
सोबत फोटो –


























