मोडनिंब – पडसाळी (ता. माढा) येथील कै. विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक विद्यालय येथे पंचायत समितीच्या मागासवर्गीय सेस फंडातून गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना एकूण १६ सायकली प्रदान करण्यात आल्या. या सायकलींमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी होऊन शाळेतील उपस्थितीत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास डॉ. संतोष दळवी यांनी व्यक्त करण्यात आला. “गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा अभिमान असावा. सर्वांनी शाळेवर प्रेम करावे आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये प्रगती साधावी. तसेच, इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब मोडनिंब आणि तेजस हेल्थ फाउंडेशनमार्फत शैक्षणिक साहित्य किंवा सायकली उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भेंडचे माजी सरपंच डॉ. संतोष दळवी, उपसरपंच प्रवीण गायकवाड, दत्ता फरड, अण्णासाहेब मुटकुळे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन फरड, तसेच परशुराम थोरात आणि राहुल थोरात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमर परबत यांनी केले, तर आभारप्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन फरड यांनी केले. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























