जालना – राज्य शासन व केन्द्र शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनेचा एकत्रीकरण करुन सर्व योजनेचा लाभ दिव्यागांना द्या तसेच शासनाच्या सूचनेनुसार सामुहिक व वैयक्तीक लाभाच्या योजना दिव्यांगापर्यंत पोहचवा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
जालना शहर महानगरपालिकेच्या सभागृहात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी (दि.3)दिव्यांग बांधवांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अति. आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर, सहाय्यक आयुक्त नागोरी, डॉ. शिगेदार , मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे, केशव कानपुडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, राष्ट्रवादी आजितदादा गट, दिव्यांग आघाडीचे सतीश फत्तेपुरे, शिवसेना शिंदे गट दिव्यांग विभागाचे अनिल मगदुले आदिंचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्रीमती राज देशमुख, भालेराव, दिव्यांग विभागप्रमुख प्रमिला मारे, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विष्णु पाचफुले, भाऊसाहेब घुगे, संतोष गायकवाड, सविता बोर्डे, रेणुका वाहुळकर, सुनिता लोळगे, अपाबी, सुनिल तिळवणे, रह्यान बेग, शेख बाबुमियॉ, शेख ईनायत, सतीश वाघ, विलास कांबळे, राजु कावेटी, प्रविण ढवळे, गोविंद चिखले, मुन्ना दायमा आदिंसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रांरभी सकाळी 10.30 वाजता दिव्यांग बांधवांची तिन चाकी मोटार रॅली मस्तगड जूना जालना ते महानगरपालिका या दरम्यान काढण्यात आली होती.

























