सांगोला – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या नरळेवाडी (ता.सांगोला) येथील मानसी मधुकर गोडसे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेतून सहाय्यक वनसंरक्षक वर्ग एक या पदाला गवसणी घातली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा कान्हापुरी (ता.पंढरपूर), माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज येथे तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण समावि, अकलूज येथे घेतले.
अकलूज येथीलच रत्नाई कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी.ॲग्री तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम.एस्सी.ॲग्री केले आहे. या परीक्षेत ती राज्यात मुलींमध्ये दुसरी आलेली आहे. या यशाबद्दल मानसी गोडसे हिचा लक्ष्मीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र नरळे, उपाध्यक्षा वैशाली जावीर, दीपक बाड, शरद गोडसे, लक्ष्मी साठे, अर्जुन करांडे, महेश गोडसे, मुख्याध्यापक संजय महाजन व शिक्षक उपस्थित होते.

























